सातारा : अन्याय अत्याचारा विरोधार्थ भक्कमपणे लढण्यासाठी भाजपा व त्यांचे संलग्न असणाऱ्यांना वगळून सर्व संघटनांची एका समन्वय समितीची स्थापना करण्यात येईल.अशी घोषणा दादासाहेब ओव्हाळ यांनी केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या विरोधार्थ निषेध मोर्चा संपन्न झाला. तेव्हा समारोपप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केली.तेव्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ मार्गदर्शन करीत होते.यावेळी विविध राजकीय,सामाजिक, धार्मिक आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यकर्त्या मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.रिपब्लिकन सेनेचे चंद्रकांत खंडाईत यांनी आभारप्रदर्शन केले.