सातारा : भारतीय बौद्ध महासभांतर्गत प्रत्येक तालुक्यात कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे.तेव्हा संस्थेस कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही.याची दक्षता घेतली पाहिजे.असे आवाहन पश्चिम विभागीय जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी केले. येथील मिलिंद कॉलनीतील सांस्कृतिक भवनमध्ये सहविचार सभा संपन्न झाली.
तेव्हा अध्यक्षस्थानावरून भालेराव मार्गदर्शन करीत होते.प्रमुख पाहुणे म्हणून अनिल वीर उपस्थीत होते.यावेळी आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमास जिल्हा आजी-माजी पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष,सातारा तालुकाध्यक्ष व त्यांची सर्व टीम उपस्थीत होती.