सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष ऍड.विजयानंद कांबळे होते.
प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास ज्येष्ट सामाजिक नेते दादासाहेब केंगार,सुनील निकाळजे,अंकित वाघमारे व गौरव भंडारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सार्वजनिक वंदना घेण्यात आली.
अंकित वाघमारे म्हणाले,”फुले दाम्पत्यानी रूढी परंपरेला मूठमाती दिली.त्यांनी सती प्रथा बंद केली.मुलींची पहिली शाळा काढून पुढे भरीव केलेले काम पहायला मिळत आहे.स्त्रियांच्या यशामध्ये ज्ञानज्योतीचेच श्रेय आहे.तेव्हा फुले दाम्पत्यांच्या विचारांवर वाटचाल करणे गरजेचे आहे.” गौरव भंडारे म्हणाले,”२० वे शतक हे सुधारणावादी शतक होते. सत्यशोधक चळवळही उभी राहिली होती.सध्या प्रतिक्रांतीचे सावंत असल्याने सामोरे जाण्यासाठी सज्ज असले पाहिजे.”
यावेळी ज्येष्ट सामाजिक नेते रमेश इंजे,अंनिसचे प्रकाश खटावकर,ऍड.विजयानंद कांबळे आदी मान्यवरांनी विस्तृतपणे ज्ञानज्योतीवर प्रकाशझोत टाकला. शाहिर श्रीरंग रणदिवे व ऍड.हौसेराव धुमाळ यांनी गीते सादर करून ज्ञानज्योतिमय वातावरण निर्माण केली.
सदरच्या कार्यक्रमास भन्ते धम्मानंद,चंद्रकांत खंडाईत, श्रीमंत घोरपडे, नानासाहेब भोसले,दादासाहेब कांबळे विश्वास सावंत,महेंद्र तथा दिलीप भोसले,सुजाता गायकवाड, किशोर गायकवाड,अशोक भोसले, अर्चना चव्हाण, गायकवाड मॅडम,स्वाती खरात,प्रीती खरात,गंगा सोनवणे,सचिन चव्हाण,किशोरी काकडे,मंदा नाईक,गगणेश भालेराव,उमेश खरात,अशोक माळी,निखिल खरात,प्रकाश डोईफोडे,अविनाश जगताप, दादासाहेब भोसले,दत्ता खरात,संतोष खरात,सांची ओव्हाळ आदी युवती,महिला,सावित्रीच्या लाडक्या लेकी,विविध क्षेत्रातील मान्यवर,संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.