ज्योती लघु चित्रपटातील बालकलाकार प्रतीक्षा बगाडेस उत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित

0

सातारा/अनिल वीर :बेलावडे,ता.जावली येथील  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांची छोटी  कन्या प्रतीक्षा हिने उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार पटकावला आहे.

 आखाडे व वालुथ या गावांमधील अभिजीत भोसले व रोहन भोसले यांच्या सहकार्यामुळे वृंदावन फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून रविराज ओवाळे व अंकिता मॅडम यांच्या मार्गदर्शनामधून वृंदावन फिल्म प्रोडक्शनच्यावतीने ज्योती नावाच्या लघु चित्रपटाची शूटिंग करण्यात आली होती. या लघु चित्रपटांमध्ये प्रतीक्षा किरण बगाडे हिची प्रमुख भूमिका होती. प्रतीक्षा हिला भंडारी सर, रविराज ओव्हाळ सर,अंकिता मॅडम, राजू गोसावी सर, अभिजीत भोसले, रोहन भोसले, विकी कांबळे या लोकांनी खूप मार्गदर्शन केले होते.कधीही अभिनयाची गोडी नसणारी कॅमेरासमोर अभिनय करू लागली. अभिनय करत असताना तिला निधन झालेल्या तिच्या मम्मीची आठवण येत होती. अभिनय करत असताना शूटिंग दरम्यान ती सायकलीवरून पडल्याने पायाला दुखापतही  झाली होती.मात्र,तिने जिद्द सोडली नाही ज्योती या लघु चित्रपटांमध्ये शोषित पीडित अतिदुर्गम व परिस्थितीतून खचलेल्या मुलीच्या शिक्षणाची व्यथा मांडलेली आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबातील मुलीला शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थिती पुढे नतमस्तक व्हावे लागते. याच शिक्षणाची व्यथा या ज्योती लघु चित्रपटांमध्ये रविराज ओवाळे व राजू गोसावी यांनी मांडली आहे. या चित्रपटांमध्ये अनेक कलाकारांनी अभिनय केला आहे काही दिवसापूर्वी या चित्रपटाला मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवार्ड तसेच TIFF तमिल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.याशिवाय, महाबळेश्वर या ठिकाणी वृंदावन फिल्म प्रोडक्शनच्या ज्योती चित्रपटाला ड्रीम हिरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल या पुरस्काराने प्रमुख भूमिकेत असणारी बालकलाकार कु.प्रतीक्षा बगाडे हिला सन्मानित करण्यात आले.याकामी, भंडारीसर, रविराज, ओवाळेसर, अंकिता मॅडम, राजू गोसावी, अभिजीत भोसले, रोहन भोसले, किरण बगाडे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.याबद्दल राजकुमार भोसले (महाराज), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.सदरच्या कार्यक्रमास चंद्रशेखर पोपळे, राम गायकवाड, उद्योजक गणेश निकम रोहन भोसले अभिजीत भोसले,अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर शिंदे, दिग्दर्शक अमित कांबळे व विविध लघु चित्रपटांमधील नवोदित कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, बालकलाकार,शिवम भोसले, अभिनेत्री स्वरूपा यादव, गणेश साळुंखे, अनुप ढेकणे, बेस्ट ऍक्टर सत्यम पारखे,ओंकार कुलकर्णी, निर्माते दत्तात्रय तितकरे, कथा सुरेश पवार, कथा पटकथा विकास बुचडे, अभिजीत भोसले, राजू गोसावी, पटकथा मांडणारे अनेक दिग्दर्शक व निर्माते व बालकलाकार उपस्थित होते,. रोहन भोसले यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here