डॉक्टर यांचा होणारा अन्याय थांबवण्यासाठी धरणे आंदोलन सुरू !

0

सातारा/अनिल वीर : वारंवार भुईंज येथील डॉक्टर आपल्यावर अन्याय-अत्याचार करीत आहेत. अशी कैफियत डॉ.मंदा संकपाळ यांनी मांडली आहे.न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे-आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

   याबाबत सविस्तर माहीती अशी : डॉ.मंदा संकपाळ यांच्यावर डॉ.शाम गीते यांच्याकडून वारंवार होणारा अन्याय-अत्याचार थांबविणेबाबत  डॉ. मंदा संकपाळ यांनी त्यांच्या स्व-हाताने त्यांच्यावर होणारा अन्याय-अत्याचार ऑल इंडिया पँथर सेनेकडे लेखी स्वरुपात अर्ज दिलेला आहे.त्याची तात्काळ गांभीयनि दखल घेऊन न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.तेव्हा  भुईज आरोग्य केंद्रामधील वरिष्ठ डॉक्टर शाम गीते यांची तात्काळ खाते निहायी चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाध्यक्ष आदित्य कांबळे यांनी केली आहे.

      याबाबत,दि.२० जून २०२४ रोजी आंदोलन केले असता त्यांची  दिशाभूल करण्यात आली होती.त्यांना सिव्हील सर्जन युवराज कर्पे तसेच जिल्हा परीषद आरोग्य अधिकारी खलिपे यांनी  पाठीशी घालण्याचे काम केले आहे.म्हणूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.याबाबतही संबंधितांना निवेदन दिली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here