सातारा : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर Dr.Ambedkar’s यांचे प्रेरणास्थान व दूरदृष्टी असलेले कणखर पिता सुभेदार रामजीबाबा Subhedar Ramjibaba आंबेडकर होते. समाजप्रबोधन मंडळाच्यावतीने कासरूड,ता.महाबळेश्वर येथील विहाराच्या प्रांगणात सुभेदार रामजीबाबा आंबेडकर यांची १७५ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष प्रकाश कांबळे होते.प्रास्ताविक सचिव सचिन कांबळे यांनी केले.
बाबासाहेबांच्या वडिलांनी शिकविण्यासाठी जे कष्ट व मेहनत घेतली ते पाहून सारे जग म्हणेल, “असा बाप जर असेल तर प्रत्येक घरात एक भीमराव जन्माला येईल.” अशा अशायाचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमास संस्थापक अनिल वीर,पो.पाटील अमित मोरे,गणेश कदम,संजय घाडगे, रमेश सपकाळ,विठ्ठल कदम, लक्ष्मण घाडगे,लक्ष्मण मोरे, लक्ष्मण कदम,संतोष कांबळे, संपत कांबळे,अजय कांबळे, गणपत कांबळे,सतीश कांबळे, आशुतोष कांबळे,प्रसाद कांबळे, रुपेश कांबळे,विजय कांबळे, लिलाबाई कांबळे,सिद्धार्थ कांबळे,रवींद्र कांबळे,के.के. कांबळे,के.डी. कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.