सातारा : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त चित्ररथास पारितोषिके जाहीर करण्यात आली होती त्याच बरोबर विविध स्टॉलधारक यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृरिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
प्रथम ३ क्रमांक पटकावलेल्या चित्ररथास व्यक्ती/शाळा/मंडळ/संस्था यांना सन्मानीत करण्यात आले.डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीमध्ये विविध मंडळ, संस्था आदी सहभागी झाले होते..त्या सर्वांना समितीतर्फे सन्मानचिन्ह देण्यात आली. सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक सिद्धार्थ प्रतिष्ठान,माजगावकर माळ यांनी पटकावला.त्यांना सन्मानचिन्ह व संविधान प्रत सचिन गायकवाड यांच्या सौजन्याने देण्यात आली. द्वितीय क्रमांक प्रबुद्ध प्रतिष्ठान जयभीम तरुण मंडळ, गुरुवार पेठ यांनी पटकावला.त्यांना सन्मानचिन्ह दादासाहेब ओव्हाळ यांच्यावतीने देण्यात आले.तृतीय क्रमांक – सिद्धार्थ सेवा संघ,करंजे यांनी मिळवला.त्यांना जाहीर केल्याप्रमाणे सन्मानचिन्ह विशाल भोसले यांच्यातर्फे देण्यात आले. अजंठा चौकातील धम्मचक्र युवा मंच यांचे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस राम मदाळे यांनी स्वीकारले.याशिवाय,अल्पोपहार,सरबत,पाणी आदी स्टॉलधारकांनी भीमसैनिकांची सेवा घडवून आणल्याबद्धल स्टॉलधारकांनाही प्रत्येकी सन्मानिका समितीच्यावतीने व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आदिनाथ बिराजे यांनी प्रास्ताविक केले.सचिन वाघमारे व माणिक आढाव यांनी सूत्रसंचालन केले.अनिल वीर यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास समितीचे पदाधिकारी,कार्यकर्ते,विविध संघटनेचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.