डॉ.जान्हवी इंगळे योगरत्न पुरस्काराने सन्मानीत

0

सातारा/अनिल वीर : अयोध्या राम जन्मभूमी येथे जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्कार 2024  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

      अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ ABYOGASMS फाउंडेशन अखिल भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित योग महाकुंभ (राममय से योगमय) अयोध्या 2024 राष्ट्रीय ओपन योगासन चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये डाॅ.जान्हवी इंगळे यांनी परिक्षक म्हणून कामगिरी बजावली. यावेळी डॉ.अनिल मिश्र(ट्रस्टी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र)यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    श्री राम सभागृह अयोध्या धाम येथे राष्ट्रीय योगवीर सन्मान 2024 सोहळ्यात जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना राजर्षि वेदमूर्ती आचार्य पवन दत्त मिश्रा महाराज,योग गुरू स्वामी अमित देव महाराज व इंडोनेशियाहून आलेले योगगुरू पद्मश्री अगुस इंद्र उदयना यांच्या हस्ते महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.

               यावेळी डॉ.दिनेश शर्मा (राज्यसभेचे खासदार),प्रांतीय समरसता प्रमुख राज किशोर, इंडोनेशियाहून आलेले योगगुरू पद्मश्री अगुस इंद्र उदयना,श्री राम महेश मिश्रा,आणि योग गुरु श्री मंगेश त्रिवेदी,आशिष अवस्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here