डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती पाडळी-हेळगाव येथे साजरी

0

सातारा/अनिल वीर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती पाडळी हेळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

    प्रथम झेंडावंदन व सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन  करण्यात आले. प्रकाश वाघमारे म्हणाले, “बाबासाहेबांचे कार्य व मौलिक विचार समस्त मानवाचे कल्याणाचे आहेत.म्हणून नाचणारा समाज नको आहे. तर वाचणारा समाज हवा आहे.”

            यावेळी दिलदार वाघमारे, संदीप लोंढे, विकास वाघमारे, नितिन वाघमारे,सतिश वाघमारे, सुरेंद्र वाघमारे,अधिक वाघमारे, कृष्णत वाघमारे,जयवंत वाघमारे, मंगेश सोनावले,समाधान वाघमारे  आदी मान्यवर,उपासिका, उपासक, ग्रामपंचायत सदस्य सौ.कमल सपकाळ, सुजाता वाघमारे,सुलाबाई वाघमारे, बायनाबाई वाघमारे,सुरेखा  वाघमारे,आम्रपाली वाघमारे, महिला,सिद्धार्थ विकास मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ,सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक तानाजीराव जाधव, उपसरपंच भागवत जाधव,प्रकाश जाधव,गणेश भोज,इतर मान्यवर  उपस्थित होते.यावेळी भिमगर्जना सामाजिक विचारमंचचे प्रकाश वाघमारे यांच्याकडून भारतीय संविधानाची प्रत ग्रामस्थ व विद्यार्थी यांना मोफत वाचनालयासाठी तानाजीराव जाधव यांना भेट देण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here