अनिल वीर, सातारा : येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये कै.ना.ह.आपटे पुरस्कार ज्येष्ट साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांनी प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध लेखक व नाटककार अभिराम भडकमकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी डॉ.राजेंद्र माने यांच्या अमित प्रकाशनतर्फे वळणावरची माणस या व्यक्तिचित्र संग्रहांच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले.
डॉ.राजेंद्र माने यांच्या साहित्यावर आधारित, “डॉ. राजेंद्र माने-साहित्यदर्शन” डॉ.अदिती काळमेख यांच्या संकल्पनेवर डॉ.काळमेख यांच्यासह चंद्रकांत कांबीरे,वैदेही कुलकर्णी,मानसी मोघे,प्रदीप कांबळे व प्रचेतस काळमेख यांनी सहभाग घेऊन कार्यक्रमास चार चांद लावला.सदरच्या कार्यक्रमास वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर,विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.श्याम बडवे यांनी प्रास्ताविक केले तर वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
सत्कारास उत्तर देताना डॉ.राजेंद्र माने म्हणाले, “समाजातील सर्व घटकांच्या सोबतीने,साक्षीने व प्रेमाने हा साहित्य प्रवास घडलेला आहे.नि, त्याचाच परिपाक म्हणून मिळालेला पुरस्कार हे त्याचेच प्रतीक आहे.”