डोईवरचा जटेचा भार अंनिसमुळे  हलका झाला !

0

 सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती मार्फत १५४ वी जट निर्मूलन कार्यक्रम तारांगण येथे पार पाडला.

  गेले अनेक वर्षांपासून डोक्यावर जटेचे ओझे घेवून त्रास सहन केला.त्याबरोबर मणके दुःखी, ताप,मानसिक ताण,सामजिक अलगता भान या सर्व गोष्टींचा विचार करून जट काढण्याचा निर्णय शेजारच्या वायदंडे मॅडम यांचे सततचे सहकार्यामुळे घेतला आहे. असे जयाताई यांनी सांगितले.

         नागठाणे गावातून जयाताई  जट काढणेसाठी अंनिस कार्यालयात आल्या होत्या.त्यांची ओळख प्रकाश खटावकर यांनी करून दिली.यावेळी जिल्हा अंनिसच्या कार्याध्यक्षा वंदना माने व उदय चव्हाण (समुपदेशक, परिवर्तन संस्था) यांनी योग्य काळजी घेत व समजदारपणाने माहिती देत दोन फूट लांब जट काढली.जटांची वाढ का होते? मग रूढी  व परंपरा यामुळे त्यात भर पडून ती जट शारीरिक, मानसिक व सामाजिक समस्या कशी बनते ? हे वंदना माने यांनी स्पष्ट केले.उदय चव्हाण यांनी केशांचे निगेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी अंनिस कार्यकर्ते डॉ. दिपक माने,भगवान रणदिवे, जयप्रकाश जाधव,विजय पवार, नाथाजी गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here