गोंदवले – ढाकणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात बाल बाजाराचे व हळदी कुंकू चे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत लहान चिमुकल्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला खाऊ व ईतर वस्तूंना घेण्यासाठी गावातील महिला व ग्रामस्थांनी गर्दी केली होती
जि.प.प्राथमिक शाळा ढाकणी मधील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य, पोलिस पाटील, सामाजिक मंडळाचे सदस्य सर्वांनी उपस्थित राहून बाल बाजाराचे उद्घाटन केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इयत्ता पहिली ते सातवी मधील मुले व मुली आपल्या शेतातील आसलेला भाजीपाला या बाल बाजारामध्ये विकण्यासाठी घेऊन आले होते शाळेमधील सर्व शिक्षकांनी बाल बाजारासाठी चांगल्या प्रकारे नियोजन केले होते तसेच यामध्ये संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ, उखाणे घेणे स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा मनोरंजनासाठी घेण्यात आली होती ढाकणी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सहभाग घेतला.