सातारा : भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ घरोघरी वाचला पाहिजे.वर्षावासही घरोघरी घेतला पाहिजे.तरच कुटुंब व समाज तथागथांच्या मार्गाने वाटचाल करेल. असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले. वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम करंजे येथील आत्माराम कांबळे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तेव्हा समारोपप्रसंगी खंडाईत मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे अध्यक्ष शामराव बनसोडे होते. सर्वत्रच वर्षावास सांगता कार्यक्रम संपन्न झाल्याची वृत्त आहेत.
चंद्रकांत खंडाईत म्हणाले, “धम्माचे आचरण केल्यानेच खऱ्या अर्थाने धम्मप्रचार-प्रसार करता येईल.”प्रथमतः घोडके कुटुंबियांनी महामानव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ग्रंथाचे वाचन मुरलीधर खरात यांनी केले. त्यावर सविस्तर भाष्य सम्यक ज्येष्ट नागरिक संघाचे सचिव बी.एल.माने यांनी केले.उपस्थीत मान्यवरांनी अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली.बी. एल.माने यांनी सूत्रसंचालन केले.
आत्माराम घोडके यांनी आभार मानले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष अनिल वीर,डी.एस. भोसले,अशोक भोसले,मारुती भोसले, चंद्रकांत मस्के,सत्यवान गायकवाड,दिलीप कांबळे,डॉ. आदिनाथ माळगे,अंकुश धाइंजे, वसंत गंगावणे,संपूर्ण घोडके परिवार,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.अल्पोपहार व खिरदादाने सांगता करण्यात आली. उशिरापर्यंत भीमबुद्ध गीतांची मैफिल रंगली होती.