तर रास्ता रोको होणारच…..मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील

0

 गोंदवले –  सातारा जिल्ह्यातिल माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे मेघा इंजीनियरिंग प्राइवेट लिमिटेड ही कंपनी रस्त्याचे काम चालू करत नसल्याने  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाअध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दि. 02/03/2023 रोजी गुरुवार दुपारी 1 वाजता रस्त्याचे काम तसेच गतिरोधक चालू न केल्यास भव्य असा रस्ता रोको तसेच संबंधित कंपनीची वहाने फिरू देणार नाही महाराष्ट्र सैनिक तसेच गोंदवले ग्रामस्थांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारीसो शैलेश सुर्यवंशी माण- खटाव मा तहसिलदार श्रीशैल वठ्ठे माण तसेच पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे दहिवडी यांना देण्यात आले.

          यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष सागर कट्टे, निलेश कट्टे, विशाल कट्टे,धिरज कट्टे, विश्वराज कट्टे, प्रथमेश नवले, लखन पारसे, विट्ठल जाधव, युवराज पाटिल, आशुतोष कट्टे, रोहित कट्टे, रणजित पडमलकर, प्रतीक सत्रे, रणजीत जाधव व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here