तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

0

प्रतापगङ प्रतिनिधी :

महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अंजुमन पब्लिक स्कूल पांचगणी येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाल्या.. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे आयोजन करणेत आले..

सदर स्पर्धांमध्ये धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, बुद्धिबळ, योगासने, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रोबाॅल, रस्सीखेच, क्रिकेट आदी प्रकारांचा समावेश करणेत आला असून त्यामध्ये सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करुन अव्वल क्रमांकाचे स्पर्धक व संघ जिल्हास्तरावर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत..सदर स्पर्धेच्या संयोजनात सहा.गटविकास अधिकारी महादेव कांबळे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, विस्तार अधिकारी विठ्ठल पवार, सुनील पारठे यांचेसह क्रीडा शिक्षक व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here