महाबळेश्वर /पाचगणी : येथील विद्यानिकेतन हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या महाबळेश्वर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा कुंभरोशी या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात वैभवी कदम हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम ,वेदांत जाधव याने लांब उडी स्पर्धेत प्रथम ,निशा शर्मा हिने लांब उडी स्पर्धेत प्रथम, प्रथमेश कात्रट याने गोळाफेक स्पर्धेत प्रथम, स्वराज पार्टे आठशे मीटर धावणे द्वितीय ,संस्कार सपकाळ याने 600 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय, वेदांत सावंत याने 400 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय, वेदांत गायकवाड याने बुद्धिबळ स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला तर सांघिक प्रकारात रस्सीखेच स्पर्धेत प्रथम ,कबड्डी स्पर्धेत द्वितीय असे क्रमांक संपादन केले . यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका शर्मिला काळे, तसेच संजय सोंडकर, गणेश गार्डी, रुपाली चव्हाण व वर्षा बुचडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड ,गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे ,विस्तार अधिकारी एन के धनावडे, केंद्रप्रमुख विनायक पवार तसेच ग्रामपंचायत सरपंच सौ. कांचन सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास मोरे व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.