सातारा : द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांनी शिरूर तालुका येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय व्यवसायिक कला क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पन्नास व्यक्तीना वेगवेगळ्या क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये राज गणेश चव्हाण यांस राज्यस्तरीय उत्कृष्ट धनुर्विद्या क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज चव्हाण हा देऊर,ता. कोरेगाव येथील असून सध्या तो सातारा येथे स्थायिक आहे.यापूर्वी त्याने अनेक शालेय स्पर्धेत त्यांनी भाग घेतला होता.विशेषतः राज्यस्तरीय स्पर्धा खेळली असून त्यामध्ये त्यांने सुवर्ण पदक व कांस्य पदक प्राप्त केलेले आहे. तसेच तो नॅशनल व विद्यापीठ स्पर्धा खेळला असून त्यामध्येही सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तो एक उत्कृष्ट धनुर्विद्या खेळाडू आहे. त्याच्या उल्लेखनीय कार्य बद्दल पुरस्कार तृप्ती देसाई (सामाजिक कार्यकर्त्या) तसेच रंगनाथ नाईकडे (मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक संचालक मुंबई) आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.