‘ते’ माजी विद्यार्थी ३० वर्षांनी आले एकत्र. 

0

देशमुखनगर :  शालेय शिक्षण झाल्यानंतर सुरूवातीला पुढच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात गेल्यामुळे सर्वांचा संपर्क तुटला. त्यानंतर नोकरी, व्यवसायातील व्यस्ततेमुळे अनेकांना भेटता येते नव्हते त्यात कोरोनामुळे दोन ते तीन वर्षे घराबाहेर पडणेही अवघड झाले होते. त्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील धनंजयराव गांडगीळ कॉलेजच्या१९९२-९३च्या बँचच्या बीकॉम पास झालेल्या माजी विद्यार्थी, विद्यार्थीनीनी नुकतेच एकत्र येऊन आपल्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला.

   सुरूवातीला हे माजी विद्यार्थी कॉलेजमध्ये जमले, कॉलेजच्या वर्गामध्ये बाकांवर बसून केलेला अभ्यास, वर्गात केलेली मस्ती या सगळ्यांच्या आठवणी ३० वर्षांनी जाग्या झाल्या. प्रत्येकजन मी या तुकडीत होतो, मी या बँचवर बसायचो, तू पुढच्या बँचवर होतास, हि मागच्या बँचवर बसायची अशा आठवणी जागवत होते. 

   यावेळी डी जी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, उपप्राचार्य डॉ. विठ्ठल सावंत, प्राध्यापक डॉ. महानवर टी डी यांनी स्वागत करून मार्गदर्शन केले. या एकत्रीकरणाचे संयोजक शिल्पा देशपांडे यांच्या संकल्पनेतून अनिल कदम, अँड. प्रदिट गोळे, राजेंद्र निकम, सतिश जाधव, शंकर निकम, संभाजी काशिद, शैलजा कदम, सुजाता चव्हाण, वर्षा नागर, निलोफर नदाफ,सिमा जगदाळे यांना एकत्र करून कॉलेज मेळावा आणि गेट टूगेदर आयोजित केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here