अनिल वीर/सातारा : ऊसतोड कामगारावर अन्याय झाला असून न्यायासाठी अनेक आंदोलने केली.मात्र,अद्याप न्याय मिळाला नाही.म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली गेले तीन दिवस झाले सुरू आहे.तरीही प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.
यासंबंधीचे सविस्तर वृत्त असे, सातारा तालुक्यातील लिंब येथे मागासवर्गीय ऊसतोड कामगारांना आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्या गाड्या तसेच 14 बैल जोड्या जबरदस्तीने गावगुंडांच्या सहकार्याने ओढून नेणाऱ्या रजपूत व सूर्यवंशी यांच्या टोळीवर सुद्धा ॲट्रॉसिटी तसेच मोकांतर्गत कारवाई होणे गरजेचे आहे.याबाबत सम्बधितांना सविस्तरपणे निवेदने दिली आहेत.तेव्हा सखोल चौकशी करून कारवाई करावी.यावेळी ऊसतोड कामगार आपापल्या कुटुंबासोबत उपोषणात सहभागी झाले आहेत. दादासाहेब ओव्हाळ यांच्यासह मदन खंकाळ (बापू), पदाधिकारी,कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी उपस्थीत होते. त्यामध्ये चंद्रकांत मस्के,ऍड. विलास वहागावकर, अनिल वीर आदी मान्यवर उपस्थीत होते.