त्या नराधमांना फासावर लटवा अन्यथा आमच्या ताब्यात द्या : वंचितसह अनेक संघटनेतर्फे निवेदन सादर !

0

सातारा/अनिल वीर : कोलकत्ता येथे झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीवरती जो अन्याय – अत्याचार झाला आहे.तो नराधम संजय राय यास फासावर लटकावावे. बदलापूर येथील शालेय अल्पवयीन २ चिमूरड्या मुलीवर अक्षय शिंदे या नराधमाने  अमानुषरित्या लैंगिक छळ करून अतिप्रसंग केला होता.त्यालाही फासावर लटकवावे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडीसह अन्य संघटनांनी निषेध व्यक्त करीत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

   

भविष्यात येणाऱ्या काळामध्ये अशा महिला,अबला व लहान मुलींवरती अन्याय – अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फास्ट ट्रॅक कायद्याचा वापर करून नराधमांना फासावर लटकावा.अन्यथा,शासन – प्रशासनाने अशा  नराधमांना जनतेच्या  ताब्यात देण्यात यावे. म्हणजे जनताच त्यांचा बंदोबस्त करेल. अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाडी पाटण तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले. एकंदरच संपूर्ण भारतामध्ये अल्पसंख्याक, बारा  बलुतेदार, व्ही जे, व्हि जे एन टी, अनुसुचित जाती जमाती व सर्व समाज तसेच  महिला व लहान मुली सुद्धा असुरक्षित आहेत.

त्यामुळे अशा घटना या फक्त आणि फक्त काही जणांच्या पाठबळावरती घडत आहेत.त्यामुळे पाठबळ देणाऱ्या शक्तीलाही दोषी ठरवून त्यांना कायमस्वरूपी जेरबंद केले पाहिजे. तसेच गुन्हा करणाऱ्यांचा खटला तात्काळ फास्ट ट्रॅकवरती चालवून आरोपींना फासावर लटकवले पाहिजे.अन्यथा, येणाऱ्या भविष्यामधील काळामध्ये बंद करून तालुकाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.त्यासाठी काही कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास शासन प्रशासनाची राहील.असाही इशाराही देण्यात आला आहे.यावेळी वंचितचे महिलाध्यक्षा सौ.रेखाताई जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप (जिल्हा) व सदानंद माने (तालुका),जयराम कांबळे, विश्वास जाधव,विनोद कांबळे, सूरज जाधव,प्रज्ञा मोहिते,बौद्ध विकास संघाचे अध्यक्ष भीमराव दाभाडे,रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष सचिन कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष आबा देवकांत आदी विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here