…..त्या नराधमाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला साताऱ्यात फाशी देत रणरागिनींचा एल्गार ! 

0
फोटो : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडताना पूजा बनसोडे व कार्यकर्त्या.(छाया-अनिल वीर)

सातारा/अनिल वीर : नागपूरमध्ये शेतमजूर महिलेवरती अमानुषरित्या अत्याचार करून तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या मृतदेहाची विटंबना करणाऱ्या क्रूरकर्मा अत्याचारित नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देत  निषेध आंदोलन संपन्न झाले. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियांच्या जिल्हाध्यक्षा पूजा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली घोषणांची बरसात सुरू होती. त्यामुळे एल्गारच रणरागिनींनी पुकारला होता.

      निषेध आंदोलन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे आंदोलन छेडण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील थापा पोलीस स्टेशन सुरेवाणी गावामधील एक शेतमजूर महिला कापूस वेचण्याकरता शेतामध्ये गेले असता ती एकटी आहे.असे पाहून त्याच भागातील दिनेश उईके, नंदकिशोर उईके व सिद्धार्थ पाटील यांनी तिला शेतामध्ये एकटेच गाठून तिच्यावरती अमानुषरित्या अत्याचार करून बदनामी होईल. म्हणून संबंधितांनी कुऱ्हाडीचा घाव घालून तिची हत्या केलेली होती.शिवाय, तिच्या मृतदेहाचीसुद्धा विटंबना केली होती.निषेध म्हणून प्रशासनाने या नालायक व नराधमांना त्वरित फासावर लटकावे. या मागणीसाठी निदर्शने करून त्या नराधवांच्या प्रतिक्रमात्मक पुतळ्यास फाशी देण्यात आली. तेव्हा शासनाने हा खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून दोषींना त्वरित फासावर लटवावे. यावेळी संगीता शिंदे,अमृता मोरे, स्मिता जगताप,दामिनी निंबाळकर, सोनाली रणबदिवे, उषा गायकवाड,विजया गायकवाड,राधिका बडेकर, सविता संकपाळ,मीना कुंटे आदी महिला कार्यकर्त्यासह बापू खंकाळ, नाना ओव्हाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here