…….. त्या पीडित कुटुंबास न्याय द्यावा : रिपब्लिकन सेनेची मागणी !

0

सातारा/अनिल वीर : मौजे गोंद‌वले खुर्द येथे एका मागास वर्गीय शेतकरी कुटुंबातील युवकास त्याच गांवातील व परिसरातील खाजगी सावकारी करणाऱ्यानी वसुलीच्या कारणावरुन आणि जातीय मानसीकतेतून मारहान व शारीरिक छळ केल्याने आपल्याच घरात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्या समाजकंटकास शिक्षा व्हावी.अशी मागणी रिपब्लिकन सेनेतर्फे कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर निषेध-आंदोलनाद्वारे करण्यात आली.  

   

  २७ जूनला गुम्हा नोंद करून १ जुलैला दाखल केला जातो. तेव्हा या घटनेला कारणीभूत असणारे संशयीत आरोपी मोकाट फिरत आहेत. त्या घटनेत ५ ते ६ संशयीत असल्याने ही सावकारी संघटीतपणे करून नियोजनबद्धरित्या युवकास आत्महत्या करण्यास मजबूर केले आहे.हा संघटीत गुन्हेगारीचा प्रकार असतानाही पोलीसांनी त्या प्रकारचे कलम लावलेले नाही. सदर घटनेतील संशयीत आरोपीवर मोक्का अंतर्गत गुन्ह्याचे कलम वाढवून संबंधीतांवर कारवाई करावी. एखाद्या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्यास शासन खडबडून जागे होते.तातडीने जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून शासनाच्यावतीने मदत जाहीर करण्यात येते. मात्र, हे मागासवर्गीय शेतकरी कुटूंब असल्याने कोणताही शासकीय प्रतीनिधी अथवा लोकप्रतिनिधीना सांत्वनपर भेट दिलेली नाही.शिवाय,कोणत्याही प्रकारची मदतही जाहीर करण्यात आली नाही.याबद्धल राज्यसरकारचा तीव्र शब्दात निषेध निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.अनुसुचित जाती –  जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत अत्याचार पिडीत कुटूंबातील व्यक्ती मयत झाल्यास त्या कुटूंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्याचे निर्देश असल्याने कार्यवाही होणे गरजेचे आहे.तेव्हा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधीत गुन्हेगारांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी. तरच पिडीत कुटूंबास तातडीने न्याय मिळेल.अन्यथा, पुन्हा रिपब्लीकन सेनेच्यावतीने तीव्र स्वरुपाची आंदोलने करावी लागतील. याची मात्र सर्व जबाबदारी शासनाची राहिल. याची कृपया नोंद घ्यावी.असेही निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे.सरतेशेवटी तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले.सदरच्या निवेदनावर प.विभागीय अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष सुनील कदम, तालुकाध्यक्ष सतीश माने, सचिव विजय मोरे व सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here