राहीलेला न्याय मिळाला नाहीतर आंदोलन उग्र स्वरूपाचे होणार !!
सातारा/अनिल वीर : संदीप जाधव उर्फ गुणरत्न मावळा यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते.चौथ्या दिवशी प्रशासनातर्फे मंडलाधिकारी, ग्रामसेवक,बीडीओ,गोपनीय विभागीय पोलीस आदी संबंधितांनी आंदोलन स्थळी येऊन सकारात्मक चर्चा विनिमय केला.अनेक मागण्या मान्यही केलेल्या असुन माफिनामा व बडतर्फी बाकी आहे.त्यामुळे तोही न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इरादाही जाधव यांनी व्यक्त केला आहे.
तांदुळवाडी येथील ग्रामस्थांची आर्थिक प्रलोभन दाखवून रोहित उर्फ सागर सदाशिव पवार यांनी फसवणुक केल्याने गुन्हा दाखल करावा.अनधिकृत नळकनेक्शन बंद करून पाण्याचा अपव्यय टाळावा.तांदुळवाडी येथील मिळकत क्र.४२८ समाजमंदिर जायबंदी केल्याने वहिवाटीस चतु:सिमा व रस्ता निश्चित करून मिळावा.तसेच वायरमन जावेद शेख हे ऑनड्यूटीवर असताना मारहाण करणाऱ्या माजी सरपंच यांचा पोलीस कारवाईचा अहवाल मिळावा.या मागण्यांवर प्रशासनाने सहमती दर्शवली आहे.जिल्हाधिकारी यांच्या प्रांगणात झेंड्याला सलामी देत जन गण मन…हे राष्ट्र गीत गाऊन भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी कार्यकर्ते उपस्थित होते.सरतेशेवटी सरबत घेऊन आमरण उपोषण सोडण्यात आले.
आ.महेश शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई यांनी प्रजासत्ताकदिनी तिरंगी ध्वजास दुय्यम स्थान देऊन प्रथम भगवा ध्वज फडकावल्याने जनतेची माफी मागावी.याबाबत माजी सरपंच राजेंद्र मतकर यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून ग्रामपंचायत सदस्यावरून हाकालपट्टी करावी.अशाही प्रमुख मागण्या आहेत.ते सर्व कोरेगाव येथे मान्यता सोडविण्यासंदर्भात निर्णय होणार आहे.जर का न्याय मिळाला नाही तर पुन्हा उपोषण सुरू करणार असल्याचे संदीप जाधव यांनी स्पष्ट केले आहे.