त्रिपुडी येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

सातारा : अष्टशील प्रतिष्ठानतर्फे भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त त्रिपुडी,ता. पाटण येथिल अष्टशील विहाराच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

      मान्यवरांनी यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास व डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पो.पाटील सौ.वर्षारणी देसाई, सरपंच सौ.पाटील व उपसरपंच राहुल देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तदनंतर अनेकांनी पुष्पांजली अर्पण केली.राहुल वीर यांनी सूत्रसंचालन केले.भागवत वीर यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत वीर यांनी आभार मानले. पदाधिकारी,कार्यकर्ते व उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते. ध्वजारोहण,फनी गेम्स,व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सदरच्या कार्यक्रमास सिद्धार्थ शिंदे, बी.डी.वीर (भाऊ),विलास वीर, सुनील वीर,समीर वीर,अनिल वीर,भीमराव वीर,धर्मरक्षित वीर,नथुराम वीर आदी मान्यवरासह उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here