अनिल वीर सातारा : माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक अर्थात,दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले असल्याने शाळांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी.त्यासाठी अध्ययनार्थीनी उजळणी करावी. तसेच प्रश्न पत्रिकांचा सराव करावा.क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
परीक्षा कालावधी : इ.१२ वी प्रात्यक्षिक/तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.२४ जानेवारी २०२५ ते दि.१० फेब्रुवारी २०२५,लेखी परीक्षा-११ फेब्रुवारी २०२५ ते दि.१८ मार्च २०२५ अखेर होणार आहे.इ.१० वी प्रात्यक्षिक/तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि.३ फेब्रुवारी २०२५ ते दि.२० फेब्रुवारी २०२५,लेखी परीक्षा दि.२१ मार्च २०२५ ते दि.१७ मार्च २०२५ अशी होणार आहे.