गोंदवले – दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची रोडरोमीओ विरोधात दबंग कारवाई करत आज दहिवडी शहरांमध्ये एसटी स्टँड परिसर,दहिवडी कॉलेज, महात्मा गांधी विद्यालय परिसर, परशुराम शिंदे कन्या विद्यालय परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी टीम तयार करून रोड रोमिओ विरोधात कारवाई करण्यात आली. समिर शेख पोलीस अधीक्षक सातारा व अश्विनी शेडगे उपविभागीय अधिकारी, वडूज यांच्या सूचनानुसार महिला पथदर्शी प्रकल्प अंतर्गत तसेच दहिवडी पोलीस स्टेशनच्या पोलीस दिदी व पोलीस काका या अंतर्गत आज ही कारवाई करण्यात आली.
दहिवडी परिसरामध्ये फिरणाऱ्या रोड रोमिओ व कॉलेजमधील तरुण-तरुणींनी, बेशिस्त वाहन चालक, विनापरवाना वाहन चालवणारे ईसम, वाहन चालवणारे अल्पवयीन मुले चालवताना सापडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून याबाबत पालकांनी सतर्क रहावे.
आज रोजी दहिवडी शहरामध्ये रोडरोमिओ यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०/११७ – ३७ केस व मोटार वाहन अधिनियम प्रमाणे -२५ केस करून 21 हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाई मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पी.एस.आय मोटे, पी.एस.आय धोंगडे, ट्राफिक हवालदार सागर लोखंडे, सहदेव साबळे, प्रकाश खाडे , निलेश कुदळे, गणेश पवार, सुधीर करचे, प्रणाली सत्रे, ऋतुजा तरटे , निलम रासकर, प्रकाश हांगे , प्रकाश इंदलकर, स्वप्निल म्हामणे, बापू खांडेकर, महेंद्र खाडे, तानाजी काळेल, यांनी सहभाग घेतला होता.