दहिवडी शाळेचा पोवाडा जिल्ह्यात एक नंबर

0

गोंदवले  ( विजय ढालपे) – : माण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं. १ व ३ या शाळेने यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेतर्गत आयोजित शाहिरी पोवाडा स्पर्धेत लहान गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सलग दुसऱ्या वर्षी आपली प्रतिभा सिद्ध केली आहे.
या विशेष यशामुळे १९ फेब्रुवारी रोजी किल्ले प्रतापगड येथे होणाऱ्या शासकीय शिवजयंती कार्यक्रम प्रसंगी या शाळेला पोवाडा सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे. त्याच दिवशी या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

या यशस्वी सादरीकरणात मुख्य शाहीर अर्णव जाधव तर कोरस साठी साहिल दडस, यशवर्धन निकाळजे, मोहसीन शेख, वाहिद मुल्ला, काव्यांजली देशमाने, स्वरा साठे, कीर्ती भिंगारे या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
या विद्यार्थ्यांच्या या यशासाठी एक नंबर शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता यादव, केशर माने, मनीषा बोराटे, रश्मी फासे व सागर जाधव तर तीन नंबर शाळेचे मुख्याध्यापक महादेव महानवर, रेखा मोहिते, मिनाक्षी दळवी, माया तंतरपाळे, नम्रता चव्हाण, दराडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौरभ माने, विशाल इंगळे, अमर ननावरे यांनी संगीत साथ दिली.

या शाळेच्या या यशावर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी रमेश गंबरे, नंदकुमार दंडिले, केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सनी साठे  व सदस्य आदि पालक व दहिवडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here