दहिवडी शाळेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा; 

0
छाया - शाळा प्रवेश दिन साजरा करताना मान्यवर ( छाया - विजय ढालपे)

‘रयत’ शिक्षण संस्थेकडून मदतीचा हात

गोंदवले प्रतिनिधी :- दिनांक १ फेब्रुवारी १८९९ रोजी  पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नं.१ या  शाळेत इयत्ता तिसरी मध्ये प्रवेश घेतला होता.याचेच औचित्य साधून शाळेमार्फत दरवर्षी  १ फेब्रुवारी हा  दिवस ‘कर्मवीर शाळा प्रवेश दिन’ म्हणून साजरा केला जातो.याचेच औचित्य साधून कर्मवीरांच्या विचाराचा व आठवणींचा ठेवा जपण्याच्या हेतूने व बालपणापासून कर्मवीरांचे विचार रुजविण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडून दहिवडी नं. शाळेस जवळपास दोन लाख रुपयांचे शैक्षणिक साहित्य अनुक्रमे ७५ इंची इन्टरऍक्टिव्ह बोर्ड,इपसॉन एच डी प्रोजेक्टर,ग्रंथालय कपाट  देण्यात आले.

या प्रवेश दिन व साहित्य लोकार्पण प्रसंगी  *सातारा जिह्याचे माजी जिल्हाधिकारी तथा सचिव ,रयत शिक्षण संस्था मा. श्री. विकास देशमुख सो Retd IAS, धाराशिव जिह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे ,गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे ,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे ,दहिवडी कॉलेज दहिवडीचे प्राचार्य संजय खेत्रे, विस्तार अधिकारी रमेश गंबरे ,केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड ,महात्मा गांधी विद्यालयचे प्राचार्य बबन खाडे,प म शिंदे कन्या विद्यालय मुख्याध्यापिका संगिता काटकर, रयत इंग्लिश मुख्याध्यापिका भारती जाधव, दहिवडी नं.१ मुख्याध्यापिका सुनिता यादव, दहिवडी नं.३ मुख्याध्यापक महादेव महानवर,दहिवडी नं.२ मुख्याध्यापिका तेजश्री जगदाळे, शिक्षक सागर जाधव,केशर माने,मनीषा बोराटे,रश्मी फासे,मिनाक्षी दळवी,माया तंतरपाळे,नम्रता चव्हाण,तृप्ती दराडे,रेखा मोहिते,विजय चव्हाण, रेखा जाधव सर्व पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य व कर्मवीर प्रेमी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर जाधव , सूत्रसंचालन राम निंबाळकर यांनी तर आभार प्रदर्शन केशर माने यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here