सातारा : माजगाव,ता.सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते दिनकर तुकाराम कांबळे यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, आई,एक मुलगा,विवाहित तीन मुली,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे सामाजिक कामामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी आदरांजली अर्पण केली आहे.जलदान विधी व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दि. २५ रोजी सकाळी ठीक ९ वाजता त्यांच्या राहत्या घरी होणार आहे.