अनिल वीर सातारा : येथील मोती चौक ते शनिवार पेठ ५०१ पाटी येथील रस्त्यालगत असणाऱ्या दुकानाबाहेरील लोखंडी जाळ्या (ब्रॅकेट) कायमस्वरूपी काढाव्यात.अशी मागणी वंचिततर्फे करण्यात आली आहे.
शहरातील मोती चौक ते शनिवार पेठ ५०१ पाटी ही बाजारपेठ आहे. या ठिकाणी दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. सदर ठिकाणी असलेल्या व्यवसायिकधारकांनी आपल्या दुकानाबाहेर लोखंडी जाळ्या (ब्रॅकेट) ठेवलेले आहेत. त्यामुळे सम विषम तारखेस गाडी पार्किंग करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास होत असतो.
काही नागरिकांना त्याचा त्रास होऊन आर्थिक भुर्दंडलाही सामोरे जावे लागत आहे. तरी आपण मोती चौक ते शनिवार पेठ पाटी लगतच्या असणाऱ्या दुकानात बाहेरून लोखंडी ( ब्रॅकेट) ज्याठिकाणी बसविलेले आहेत.त्या ठिकाणांहून कायमस्वरूपी काढण्यात याव्यात. नाहीतर तेथील नो पार्किंग झोन रद्द करण्यात यावे.जर असे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी शहरातर्फे वाहतूक नियंत्रण शाखेसमोर वंचित स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा शहाराध्यक्ष मिलिंदभाऊ कांबळे यांनी दिला आहे.