धम्मकार्यात फणसे परिवाराचे योगदान आहे.

0
फोटो : शांताबाई फणसे व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर,उपासक व उपासिका.

सातारा : पहिल्या पासुनच धम्म कार्यात फणसे गुरुजींचे योगदान आहे.त्यांचे धम्म शिलेदार एकजुटीने कार्यरत होते. तेव्हा हाच वारसा फणसे परिवाराने अखंडीत असा वारसा पुढे चालु ठेवावा.असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे  अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.

             कोडोली,ता.सातारा येथे कालकथीत शांताबाई एकनाथ फणसे यांचा २३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.तेव्हा आदरांजलीपर खंडाईत मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, “धार्मिक किंवा इतर क्षेत्रात भरीव असे कार्य करण्यासाठी घराघरात कार्यकर्ते निर्माण झाली पाहिजेत. तरच चळवळीचे महत्व आई अथवा पत्नीस समजून येईल. हाच अनुभव फणसे कुटुंबात पहिल्या पासून आढळून येत आहे.शांताबाई आई या मातेचा त्याग होता म्हणूनच त्यांनी माजी तत्कालीन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष कालकथीत एकनाथ फणसे गुरुजी यांच्या पाठीमागे सावली सारख्या राहिल्या होत्या.”

         धम्मबांधव उत्सव कमिटीचे कोषाध्यक्ष विकास तोडकर म्हणाले, “आईचे उपकार महान असतात.तेव्हा सर्व क्षेत्रात उपकाराची जाणीव असली पाहिजे.कृतज्ञ असावे कृतघ्न असता कामा नये.कोणताही उपकार पैशाने पूर्ण होत नाही.” गौतम कांबळे म्हणाले,”धम्म संस्कार फणसे परिवारात आहेत. त्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांनी धम्माचरण केले पाहिजे.” सत्वशीला एस.कीर्तने म्हणाल्या,” आईची ओढ सर्वांनाच असते. त्यामुळे तिने केलेल्या निस्सीम त्यागाचे संस्मरण कायम केले पाहिजे.” अनिल वीर म्हणाले, “आई यांनी जन्म दिला म्हणून आपण या जगात आलो आहोत.तेव्हा जन्मदात्या आई – वडिलांना विसरता कामा नये.याच संस्कारामुळे दिलीप फणसेसाहेब यांचे व्यक्तिमत्व सर्वसमावेशक आहे. सीमेवर सैन्य संरक्षणार्थ लढत असते.त्यामुळे इतरांना जे जे काम आहे.ते प्रामाणिक काम करून देशसेवा करण्याचेच कार्य आहे.तेव्हा एका घटकानेच काम केले पाहिजे.असा काही दंडक नाही. अनेक क्षेत्रातील लोकांनी  मानवाने विविध क्षेत्रात कार्यरत राहिलेच पाहीजे.मात्र, स्वत:/कुटुंब/इतर कामे करूनच धम्माचे काम करण्यासाठी वेळ असेल तरच विहार/पुतळा परिसरात वेळेवर हजर राहिले पाहिजे. वंदनेचा कार्यक्रम संपला की, प्रत्येकजण आपापल्या कामास जाऊ शकतात.तसेच धार्मिक, सामाजिक आदी विषयावर प्रबोधनात्मक कार्य कोण्हीही करू शकते.(सर्वानाच अधिकार आहे.कोणा एकाची मक्तेदारी नाही.)खरोखरच, धम्माचे आचरण करीत असेल तो टीकाटिप्पणी करूच शकत नाही.”

            भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन प्रमुख दिलीप फणसे यांनी प्रास्ताविकपर धम्म आणि फणसे परिवार याबाबत विवेचन केले.यावेळी वामन गायकवाड, दिलीप आदींनी मनोगत व्यक्त केली.सदरच्या कार्यक्रमास नंदकुमार काळे,धम्मचारी संघादित्य, पुष्पा सुरेश पवार, मंदाकिनी शहाजी हिरवाळे, सौ.शोभा दिलीप फणसे, दिनेश माने,चंद्रकांत फणसे,गणेश कारंडे, खरात,संतोष मोरे,ऍड. प्रा. विलास वहागावकर,महादेव मोरे,विजय खंडाईत,प्रकाश काशीळकर-कांबळे आदी उपासक-उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. उशिरापर्यंत भाजनांची मैफिल रंगली होती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here