सातारा/अनिल वीर : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त बोधीसत्व बुध्द विहार, पाटण येथे वंदना घेण्यात आली.
प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका कोषाध्यक्ष आनंद गुजर,सचिव रुपेश सावंत, ऑडिटर ॲड.राहुल भोळे,संस्कार विभागाचे दगडू तांदळे,सचिन बल्लाळ, मुंबई कमिटीचे सचिव संजय जाधव वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष व बौद्ध बंधू भगिनी उपस्थित होते.