सातारा : कोणत्याही क्षेत्रातील कार्य उत्तम करता येते.तरीही अतित्तोम अथवा महान कार्याची पोहचपावती ही धम्मचरणी नतमस्तक झाल्यानंतरच प्राप्त होत असते.असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिष्टचिंतन सोहळे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.तेव्हा खंडाईतआप्पा मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ट सामाजीक कार्यकर्ते व गायक मंगेश डावरे होते.यावेळी अभिष्टचिंतनपर अनेकांनी भीमशक्ती संघटना कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष दयानंद बनसोडे व बंधुत्व समारत्न पुरस्कार विजेते गौतम माने यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला.प्रथमतःपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.सार्वजनिक विधी,केक कापणे,पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन व भेट वस्तू देऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले.समारोप्रसंगी केकसह बनसोडे यांनी खाऊ वाटप केले तर ऋतु हॉटेलमध्ये माने यांनी नाष्टा-चहापानाने सांगता केली. सदरच्या कार्यक्रमास भीमशक्ती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव राजरतन कांबळे व प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब शिरसाट,डॉ.विनीत नलावडे, अमोल बनसोडे,प्रा. विलास वहागावकर,संजय नितनवरे, अशोक किर्ते,सतीश भोसले, जगदीश गायकवाड, शाहिर प्रकाश फरांदे,रिपब्लिकन सेनेचे प.संघटक गणेश कारंडे व तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, सौ.संजीवनी मोरे,सौ.शुभांगी बनसोडे,सौ.रंजना भोसले,सौ. सुरेखा शिंदे,मधुकर आठवले, अमर शिंदे,विशाल पवार,वंचित संघर्ष मोर्चाचे महासचिव श्रीरंग वाघमारे,संतोष कदम,अक्षय थोरवडे,समाधान जावळे,रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,बाळासाहेब सावंत, विश्वास सावंत,मधुसूदन काळे, जिल्हा आरपीआय उपाध्यक्ष संतोष कीर्तिकर,भारतीय बौद्ध महासभेचे तारळे विभागीय अध्यक्ष भानुदास सावंत, पीएसआय सेवानिवृत्त विजय माने,सुनील माने,सौ.सुमा माने, अतुल माने,अनिल वीर आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी सातारा व गावच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत. याशिवाय,विविध माध्यमाद्वारे व अप्रत्यक्षपणेही अनेकांनी बनसोडे-माने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.