अनिल वीर सातारा : जिल्हास्तरीय भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने महाविहार येथे होणाऱ्या धम्मपरिषदेस उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.असे आवाहन महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर.थोरवडे यांनी केले.
जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची (पश्चिम विभागीय) महत्वपूर्ण सहविचार सभेचे आयोजन येथील सांस्कृतिक सभागृह (मिलिंद कॉलनी) येथे करण्यात आले होते.तेव्हा थोरवडे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव होते.यावेळी जिल्हाध्यक्षा सौ.संगीताताई मंगेश डावरे,उत्तम पवार,भागवत भोसले,सुनिल सकपाळ,सचिन आढाव,कांबळे व यादव मॅडम उपस्थीत होत्या.
यावेळी दि.२४ डिसेंम्बर रोजी महाविहार येथे होणाऱ्या धम्म परिषदेच्या नियोजनार्थ चर्चा-विनिमय करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात महिला उपासिका शिबिरांचे आयोजन करणे. श्रामनेर शिबिरात सहभागी होणाऱ्यांची यादी, धम्मदान व अन्य विषयांवर सकारात्मक चर्चा-विनिमय करण्यात आला.प्रथमतः महापुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर विधी पार पाडण्यात आला.जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे यांनी सूत्रसंचालन केले.किरण कांबळे, मनोज वाघमारे आदींनी स्वागत केले.सदरच्या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष बी.जे.माने (कराड), आनंदा गुजर(पाटण), ऍड. विजयानंद कांबळे(सातारा) आदी जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,ऍड.वहागावकर, पत्रकार,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.