धम्मप्रचार-प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा रविवार सन्मान होणार !

0

सातारा : वर्षावास प्रवचन मालिका – २०२४ आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या काळात गावोगावी जाऊन सातारा तालुक्यातील बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल प्रवचन देणाऱ्या व्यक्तींना रविवार दि.२० रोजी सकाळी ११ वा.जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे (प.) अध्यक्ष अशोक भालेराव यांच्या हस्ते शिल्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांची प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास सम्बधितांनी येथील सांस्कृतिक भवन ( मिलिंद हौसिंग सोसायटी जरंडेश्वर नाका सदर बझार) येथे वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन मुख्य आयोजक भा.बौ. महासभेचे जिल्हा सरचिटणीस दिलीप फणसे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here