धम्मप्रचार-प्रसार करण्यासाठी स्वतःपासून सुरुवा करावी : भन्ते दिंपकर

0

सातारा : दुसऱ्यास सांगे….या उक्तीप्रमाणे प्रथमतः स्वतः धार्मिक संस्कार आचरणात आणले पाहिजेत.त्यानंतरच लोकांना सांगावे.अर्थात, आधी केले मग सांगितले.तरच खऱ्या अर्थाने धम्म प्रचार-प्रसार होईल. असे प्रतिपादन भन्ते दिंपकर (थेरो) यांनी केले.

    येथील सांस्कृतिक सभागृहा शेजारील धम्मबांधव बाळासाहेब सावंत यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला. तेव्हा भन्ते मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे तथा केंद्रीय शिक्षक भागवत भोसले होते.सावंत कुटुंबियांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सम्यक ज्येष्ट नागरीक संघाचे बी.एल.माने यांनी भ.बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातील काही पानांचे वाचन केले.तद्नंतर मारुती भोसले,भागवत भोसले व बी.एल.माने यांनी स्पष्टीकरण दिले.सदरच्या कार्यक्रमास धम्मशील चॅरिटेबल ट्रस्टचे विलास कांबळे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,उपाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ व ऍड.विलास वहागावकर, कार्याध्यक्ष अनिल वीर,पतसंस्थेचे चेअरमन अशोक भोसले,अंकुश धाइंजे,गणेश कारंडे,वामन गंगावणे,सुखदेव घोडके,शाहिर श्रीरंग रणदिवे, शाहिर जगताप,तुकाराम गायकवाड, महादेव मोरे, दिलीप कांबळे,चंद्रकांत मस्के, मोरे संतोष आदी कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,उपासिका व उपासक मोठ्या संख्येनी उपस्थीत होते. आबासाहेब दणाने यांनी विधी पार पाडला. बाळासाहेब सावंत यांनी आभार मानले.यावेळी भीमबुद्ध गीतांची मैफिल रंगली होती. स्नेहभोजनांनी सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here