धम्माचरण जीवन सुखसमृद्धीचा आनंद : धम्मचारी अभयबोधी

0

अनिल वीर सातारा : मानवाने बुद्धांनी दिलेल्या धम्माचरण केले पाहिजे. तरच जीवनात सुखसमृद्धी येईल.असे प्रतिपादन धम्मचारी अभयबोधी यांनी केले. कालकथित जगन्नाथ (आबा) सटवा जाधव यांचा ५ वा स्मृतिदिन निवकणे,ता. पाटण या ठिकाणी संपन्न झाला.तेव्हा धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.तेव्हा धम्मचारी अभयबोधी मार्गदर्शन करीत होते.बौद्धाचार्य अरविंद गुजर यांनी  सूत्र पठण केले.या प्रसंगी कुटुंबातील सर्व सदस्य यांनी प्रतिमांचे पूजन केले.

      धम्मचारी अभय बोधी यांनी आपल्या प्रवचनातून धम्माचा आणि सुखी जीवनाचा मार्ग या प्रमुख विषयावर जमलेल्या सर्व बांधवांना प्रमुख मार्गदर्शन केले. धम्माचे आचरण केल्याने आपण जीवनातील खरा आनंद आणि सुख प्राप्त करू शकतो. असे अभयबोधी यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले.यावेळी आबांच्या जीवन चरित्रावर  आदरांजली मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी आत्माराम कांबळे, ज्येष्ठ धम्म प्रचारक , श्रामनेर विनोद मोरे, प्रशिक्षक प्रकाश काशीळकर, प्राणलाल माने,विजय पवार, प्रकाश कांबळे,दादासाहेब ,सौ.विद्या शिंदे (भ्रष्टाचार निर्मूलन समिती पाटण), प्रा.विजया म्हासुरणेकर, सरपंच जोतिबा बावधने, उपसरपंच विजय कदम, अमर जगन्नाथ पाटणकर,सौ. रेखा व संजय जाधव (तालुकाध्यक्ष, वंचित आघाडी),अभिजित देसाई, गजानन पड्याल, प्रकाश कांबळे, जयसिंग मराठे, संजय भंडारे, यशवंत सावंत ,निवृत्ती मगरे, नंदकुमार गवळी, अरविंद नाईकडे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ,उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन मुख्याध्यापक विजय भंडारे यांनी केले.याकामी जगत शांती प्रतिष्ठान व धम्मदीप बौद्धजन मंडळ यांनी अथक असे परिश्रम घेतले. संजय जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here