धर्मनिरपेक्षता आंदोलनतर्फे प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

0

सातारा :- शहीद भगतसिंह मित्र मंडळ, धर्मनिरपेक्षता आंदोलन, राष्ट्रोत्सव संयोजन समिती आदी तत्सम संघटनांच्यावतीने येथील गोलबाग (राजवाडा) येथे संविधान पोस्टर प्रदर्शनासाह देशभक्तीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    दरम्यान,शहर व परिसरात कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून संविधान प्रचार प्रसाराचे कार्यक्रम घेतले.श्रीमंत छ. प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यासमोर संविधान प्रास्ताविकेचे भला मोठा  फलक उभारला होता.प्रारंभी, ज्येष्ट साहित्यिक डॉ.राजेंद्र माने, प्रा.श्रीधर साळुंखे,भगवान अवघडे,सलीम आतार,रवी आफळे, अनिल वीर आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.दिवसभर ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाटप व वाचन करण्यात आले. शाळा-कॉलेजात ध्वजारोहन, प्रास्ताविकेचे वाचन,खाऊ वाटप व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी संविधान संदर्भात घोषणांनी राजवाडा परिसर दणाणून गेला होता.यावेळी भगवान रणदिवे,परवेज सय्यद, शिरीष जंगम, प्रकाश खटावकर, भगवान अवघडे,सलीम आतार, रवी आफळे,दादा आवटे,अनिल वीर आदी संविधानप्रेमी मोठ्या संख्येनी उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here