धर्मनिरपेक्षतेची समाजाला गरज आहे : प्राचार्य अरुण गाडे

0
फोटो : भ.बुद्ध व बाबासाहेब यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना मान्यवर व कार्यकर्ते.

सातारा :  डॉ.बाबासाहेबांनी संविधानच्या माध्यमातून सर्व समाज घटकांना न्याय दिला आहे.तेव्हा सध्याची परिस्थिती पाहता धर्मनिरपेक्षतेची गरज आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी केले.

   अखिल भारतीय होलार समाज संघटनेतर्फे येथील राजवाडा गोल बागेजवळ आयोजित केलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सरबत वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी डॉ.गाडे मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष लालासाहेब आवटे होते.

 प्रथमतः भ.बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या मूर्तीस अनुक्रमे अनिल वीर व दादासाहेब केंगार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर डॉ.गाडे,वीर,ऍड. विलास वहागावकर आदी मान्यवरांनी दिपप्रज्वलन केले. यावेळी मान्यवरांनी सरबत वाटप केले. सदरच्या कार्यक्रमास समाजकल्याण’चे गोसावीसाहेब, ज्येष्ट कार्यकर्ते विजय मांडके, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश नामदास, विजय खांडेकर मानसिंग शेलार ,जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत खांडेकर, तालुकाध्यक्ष धनंजय आवटे, सातारा शहराध्यक्ष सोमनाथ अहिवळे ,सातारा शहर उपाध्यक्ष नरेंद्र आवटे ,सातारा शहर खजिनदार युवराज करवले,  योगेश करवले. किरण गोळे, सचिव मनोज जाधव ,राम पवार , गणेश आहिवळे, बाळू करवले, शरद शेलार शिवराज आहिवळे, पिंटू गोळे,संदीप गोरे, विशाल आवटे, विशाल अनमोल शेलार, तुषार आवटे, राजू आवटे संतोष आवटे, रामा गेजगे, राहुल करवले, अशोक मोरे, शिवा नामदास,  सागर आवटे, हनुमंत तोरणे, अनिल करवले आदी मान्यवरासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत व पदाधिकारी यांनी भेटी देऊन अभिवादन केले.सदरच्या कार्यक्रमास शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here