पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी वर्धन एग्रो प्रोसेसिंगचे चेअरमन धैर्यशील कदम यांची नुकतीच प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड जाहिर केली त्याबद्द्ल त्यांच्या निवास स्थानी पुसेसावळी येथे सातारा जिल्हा युवा मोर्चा चे उपाध्यक्ष धीरज जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला, यावेळी युवा नेते धीरज जाधव यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठाम पणे उभी राहिल असे मत भाजपा चे नूतन अध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी व्यक्त केले.
विविध सामजिक आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणारे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणारे खटाव तालुक्याचा बुलंद आवाज म्हणुन ओलखले जाणारे व्यक्तिमत्व यांच्या पाठीशी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी कायम उभी आहे व राहिल..
आमदार महेश शिंदे यांचे लाडके कार्यकर्ते अशी ओळख असलेल्या धीरज जाधव यानी सर्व सामान्य जनते पर्यन्त पोहचाव त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात त्यांचे प्रश्न सोडवावेत त्यासाठी लगणारी ताकद देण्यासाठी आम्ही तयार आहोत असे मत जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले यावेळी युवा उद्योजक तथा ग्रामपंचायत सदस्य अजयशेठ जाधव ,राजुभाऊ मुलाणी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…