सातारा : प्रमिलाताई शिंदे यांनी गेली ३४ वर्षे सेवा चांगली केली आहे.म्हणूनच त्यांनी जिल्हा रुग्णालयात प्रत्येकाच्या हृदयात नाव कोरले आहे.त्यांनी दिलेल्या आदर्शावरच नवीन पिढीने वाटचाल करावी.अनुकरणीय प्रत्येकांनी असले पाहिजे.असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज कर्पे यांनी केले. येथील जिल्हा रुग्णालयातील सौ.प्रमिला नंदकुमार शिंदे यांच्या कर्तव्ये पूर्तीचा सांगता समारोह संपन्न झाला.तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.युवराज कर्पे मार्गदर्शन करीत होते.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राहुल खाडे म्हणाले,”सेवानिवृत्त न म्हणता कर्तव्ये पूर्तीचा सांगता समारोह म्हटले पाहीजे.कारण, त्यांनी आपल्या नोकरीत प्रामाणिक काम केलेले असते.”यावेळी प्रमिलाताईंबद्धल सुरेश जाधव, माने सिस्टर, सुरेखाताई, जी. व्यंकटेश,डॉ.सुभाष कदम आदींनी भरभरून माहिती कथन केली. संतोष तथा सनी शिंदे यांनी आपल्या आईवडिलांबद्धल मनातील भावना पहिल्यांदा विस्तृतपणे व्यक्त केल्या.सदरच्या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, पदाधिकारी,सर्व विभागीय कर्मचारीवर्ग,सर्व शिंदे परिवासर,स्नेही,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.
प्रमिलाताईं निवृत्त झाल्याने अनेक मान्यवरांनी सत्कार केला. त्यामध्ये भाजपाचे माजी नगरसेवक विजयकुमार काटवटे, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर अडागळे,आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष स्मिता जगताप आदीसह जिल्हा रुग्णालय सातारा येथील केस विभागातर्फे सत्कार करण्यात आला.त्यामध्ये संजय नितनवरे, ऋतुजा वीर, सुप्रिया भोकरे, रसिका गायकवाड, कीर्तीकुडाव यांच्यासह ऍड.विलास वाहागावकर,नंदकुमार शिंदे, अनिल वीर, विकास शेंडगे पाटील,विजय निकम,वैभव गवळी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आदींचा समावेश होता. सौ.मोनिका शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.प्रमिला शिंदे यांनी मनोगतासह आभार मानले. सरतेशेवटी उपस्थितांनी मिष्टान्न भोजनाचा लाभ घेतला.