अनिल वीर सातारा : ९० पार करूनही वसंराव कांबळे यांनी धार्मिक कार्य सुरू ठेवले आहे.त्यांचे समाजकार्य अविरतपणे चालू असल्याने आजच्या पिढीने आदर्श घेतला पाहिजे.असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस तानाजीराव बनसोडे यांनी केले.
चरेगाव,ता. कराड येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते,भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्य, गायनातून प्रभोधन करणारे पहाडी आवाजाचे उत्तम गायक, होत असलेल्या महाविहारासाठी अनमोल धम्मदान देणारे धम्मदान दाते अशी बिरुदावली लाभलेले कांबळे याची वयाची ९० वर्षे पूर्ण होऊन ९१ व्या वर्षात पदापर्ण करीत आहेत. त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे आजी – माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिष्टचिंतनपर सत्कार करून शुभेच्छा दिल्या.