गणेश माने वारणावती
मलकापूर हायस्कूल व श्रीमान ग. रा. वारंगे कनिष्ठ महाविद्यालयातील ८० किलो गटामध्ये आदेश वसंत मोहिते याने प्रथम क्रमांक ,तर १७ वर्षे वयो गटातील ५२ किलो वजन गटात सुमेध बाबासो कांबळे यानेद्वितीय क्रमांक पटकवला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड संयुक्त विद्यमाने तसेच ऑल महाराष्ट्र वुश असोसिएशन व नांदेड जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय वुशू (१७ व १९ वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धा सन२०२२-२३ चे आयोजन दिनांक २१ ते २४ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल नांदेड येथे करण्यात आले होते.या स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्यातील ८ विभागातून जवळपास ३५० ते ४०० खेळाडू, पंच, सामनाधिकारी, निवड समिती सदस्य व स्वयंसेवक उपस्थित होते. खेळाडू मुलांची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास गुरुद्वारा परिसर नांदेड येथे तर खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली होती
स्कूल कमिटी, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन व क्रीडा शिक्षक सुकुमार आडके यांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळाले.