सातारा/अनिल वीर : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नागठाणे ता.सातारा यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा चौंडेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमूख अतिथी पंचायत समिती माजी सदस्या सौ.विजयाताई गुरव, बीटचे शिक्षणविस्ताराधिकारी सौ. सुजाता जाधव,केंद्रप्रमूख शदादाजी बागुल,उपसरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य किरण साळुंखे ,रविराज साळुंखे सौ.वंदना सुतार, सौ. शशिकला जाधव,संतोष साळुंखे तसेच राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कृत माजी पोलिस निरीक्षक बत्तू तात्याबा मोहिते,सत्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश साळुंखे.उपाध्यक्ष सौ. पुनम सागर साळुंखे.कपिल साळुंखे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.माजी विद्यार्थी बत्तू मोहिते यांनी शाळेच्या विकासासाठी पाच हजार रुपयांची देणगी देऊन बहुमोल सहकार्य केले.याकामी, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक यांनी अथक असे परिश्रम घेतले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य, पालक, ग्रामस्थ व अध्ययनार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.