सातारा दि. 3 : जिल्हा परिषद व मध संचालनालय महाबळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांना 175 मध पेट्यांचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारी नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्रातील अशा प्रकारची पहिलीच योजना आहे.
यावेळी कृषी विकास अधिकारी विजय माईनकर, मध संचालनालयाचे श्री. पाटील, मंडळाचे सभापती रविंद्र साहेब, मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशु सिन्हा उपस्थित होते.
या योजनेतून शेतकऱ्यांना मधाचे उत्पादन होणार आहे. त्याचबरोबर परागीकरण करुन पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. ही योजना 100 टक्के अनुदानित असून यामध्ये 50 टक्के अनुदान जिल्हा परिषदेमार्फत व 50 टक्के अनुदान मध संचालनालय मार्फत दिले जाते. तरी सन 2023-24 मध्ये या योजनेत सहभागी होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन कृषी विकास अधिकारी श्री. मानईनकर यांनी केले आहे.