सातारा/अनिल वीर : रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी गावोगावी स्वाभिमानी कार्यकर्ता निर्माण केला आहे.असे गौरवोद्गार जिल्हाध्यक्ष अशोकबापू गायकवाड यांनी काढले.
ना.आठवले यांचे अभिष्टचिंतन, मनुस्मृती दिन तथा स्त्री मुक्ती दिन असा संयुक्तिक कार्यक्रम सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. तेव्हा जिल्हाध्यक्ष गायकवाड अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले,”सामाजीक न्याय मिळण्यासाठी आपला पक्ष कार्यरत आहे.मनुस्मृतीचे दहन झाले असले तरी अजूनही काहींच्या विचारधारेत बदल आढळुन येत नाही.संविधानाने सर्वांनाच हक्क दिलेले आहेत. तेव्हा समाजातील सर्व घटकांनी गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे.”
यावेळी ना.आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.प्रथमतः अशोकबापू गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यानी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तालुकाध्यक्ष आप्पा तुपे,जिल्हा युवा उपाध्यक्ष प्रतीक गायकवाड,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुजाताई बनसोडे आदींनी स्वागत केले.जिल्हा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंधुत्व युवा पुरस्कार विजेते वैभव गायकवाड यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.