सातारा : कोणेगाव,ता.कराड येथील ज्येष्ट सामाजीक कार्यकर्त्या निर्मला (बाळूताई) आनंदा चव्हाण यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुले,सुना,एक मुलगी,जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
बाळुताई या नावाने त्रिपुडीसह सर्वत्र त्या परिचित होत्या.धार्मिक वृत्तीच्या होत्या. शिवाय,भिम-बुद्ध गीतेही त्या आपल्या गोड आवाजात गात होत्या.त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यांचा जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.