मागील पुनरावृत्ती होणार नसल्याचाही आंदोलन कर्त्याचा निर्वाळा
अनिल वीर सातारा : परवाने घेऊनही नागरिकांना स्टॅम्प विक्री न करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे निलंबन केले असतानाही अद्याप त्यांच्याकडून मुद्रांक विक्री सुरू आहे. मागील आंदोलन सुयू केलेले तब्बेतीच्या कारणास्तव प्रशासनाने उचलून नेले होते. त्यामुळे ते चिरडले गेले. त्यांनी आश्वासन देऊनही योग्य ती कार्यवाही केली नाही. म्हणून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलव आहे. ४ दिवस होऊन गेले तरी अद्याप ठोस भूमिका शासनाने घेतली नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही.तोपर्यंत माघार नाही. प्रशासनाचा दबाव आला तर आत्महत्त्याही करेन. असे स्पष्ट करीत मिलिंद कांबळे यांनी कारवाई करण्यावर ठाम आहेत. विविध पक्ष संघटनांनी भेटून जाहीर पाठींबा दिला आहे. त्यामध्ये प्रशांत माने,युवराज कांबळे, संदीप कांबळे, सुधाकर काकडे,विशाल मोरे,अनिल वीर आदींचा समावेश आहे.
मुद्रांक विक्रेत्यांनी अतिक्रमणात बांधलेले शेड तत्काळ हटवावे, या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.मिलिंद कांबळे म्हणाले,”जिल्हा सह निबंधक कार्यालयासमोरील शेडमध्ये बसलेले बरेच मुद्रांक विक्रेते स्टैंप विक्री करत नाहीत. त्यामुळे जिल्हा सह निबंधकांकडे तक्रार केल्यानंतर मुद्रांक विक्री न करणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. मात्र तरीही संबंधित मुद्रांक विक्रेते त्याच शेडमध्ये बसलेले असतात. त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच मुद्रांक विक्रेत्यांनी बेकायदेशीरपणे उभारलेले शेड तात्काळ हटवावे.
या मागण्यांसाठी यापूर्वी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे परत उपोषण सुरू केले आहे. पिटिशन रायटर यांच्याही परवान्याची मुदत संपली असून त्यांच्यावरही कारवाई झाली आहे. एकाच टेबलवर ते चार-चार जण बसलेले असतात. गेले चार दिवस उपोषण सुरु असूनही दखल घेण्यात आली नाही.जोपर्यंत कारवाई होत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला.