निवकणे येथे दि.१९ रोजी जयंतीचे आयोजन

0

सातारा/अनिल वीर : धम्मदीप बौद्धजन मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती निवकणे,ता. पाटण येथे बुधवार दि.१९ रोजी साजरी करण्यात येणार आहे.

   सकाळी ९ वा ध्वजवंदन – साधू जाधव यांच्या हस्ते होणार आहे. १० वा.धम्मवंदना व सुत्रपठन – भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य अरविंद गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.सायंकाळी ४ वा.भव्य मिरवणूक,६ वा. धम्मदेशना – भदंत  धम्म विरीयो बोधी (मुंबई) होणार आहे.रात्रौ ८ वा.गायन पार्टी – रेखा संजय जाधव व सहकारी सादर करणार आहेत. तेव्हा परिसरातील धम्म उपासक-उपासिका यांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here