सातारा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी निसर्ग संपदा वाढविणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन ऍड. हौसेराव धुमाळ यांनी केले.
महाराष्ट्र अंनिसचे प्रशांत पोतदार यांच्या जन्मदिनानिमित्त वृक्षारोपण त्याच्या निवास परिसरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तेव्हा राज्य अंनिसचे कायदा विभाग सदस्य ऍड.हौसेराव धुमाळ यांनी मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले, “अंधश्रद्धा ही समाजास लागलेली कीड आहे.तिचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अंनिस कार्यरत आहेत.त्याच धर्तीवर सामाजीक आरोग्य स्वास्थ्य राखण्यासाठी ठिकठिकाणी वृक्षारोपण केले पाहिजे.”
यावेळी जुलै २०२४ च्या अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्राचे प्रकाशन करण्यात आले.उपस्थित सर्व मान्यवरांना प्रशांत पोतदार यांनी वार्तापत्रासह जादूटोणा विरोधी कायद्याची चित्रमय पुस्तिका भेट दिली.दरम्यान, वनवासवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खाऊ व शालेय उपयोगी साहित्यही वाटप करण्यात आले.यावेळी प्रशांत पोतदार यांच्या अभिष्टचिंतनपर बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शिवाय, सर्वांनीच मनोगतातून सर्वगुणसंपन्न असलेल्या पोतदार यांच्यावर स्तुतीपर शुभेच्छांचा वर्षाव केला.मानस पोतदार व सौ. वृषाली प्रशांत पोतदार यांनी स्वागत केले.वीर पोतदार यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास महाराष्ट्र अंनिसचे भालचंद्र गोताड,जिल्हा प्रसार माध्यम सचिव दशरथ रणदिवे, जिल्हा वार्तापत्र सचिव प्रकाश खटावकर,अनिरुद्ध वीर,पुरोहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते.